---Advertisement---

Hadapsar News : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील ४२ यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

Published On:
Hadapsar News
---Advertisement---

Team MyPuneCity – रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज हडपसर (Hadapsar News), अमृतवेल ग्रामविकास प्रबोधनी आणि अमृतवेल मिडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, ‘अमृतवेल गव्हर्नन्स’ विशेषांकाचे प्रकाशन आणि ‘अमृतवेल गव्हर्नन्स सुपरवुमन’ यांचा सत्कार समारंभ विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, हडपसर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

एस. एम. जोशी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील ४२ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘अमृतवेल गव्हर्नन्स’ विशेषांकाचे प्रकाशन सहआयुक्त नेहा देशपांडे (IRS) आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS Retd.) यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (Hadapsar News) रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS Retd.) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाच्या सहआयुक्त नेहा देशपांडे (IRS) उपस्थित होत्या.

[metaslider id=”3320″]

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दिशादर्शन

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहआयुक्त नेहा देशपांडे (Hadapsar News) यांनी यशस्वी होण्यासाठी चार मूलभूत घटक – निर्धार, कष्ट, वेळेचे नियोजन आणि संयम यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. परीक्षेच्या तयारीदरम्यान आलेल्या अडचणींना धैर्याने तोंड देण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सुचवले.

Hadapsar News

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दहावी व बारावीनंतर योग्य वेळी ध्येय निश्चित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी स्पर्धा परीक्षेत मेहनतीने अभ्यास करून यश मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, रयत शिक्षण संस्थेच्या नव्या उपक्रमांबद्दल माहिती देताना, पुढील शैक्षणिक वर्षांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि कोडिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

River development project: पिंपळे सौदागर येथे मानवी साखळी करत नागरिकांचा नदी विकास प्रकल्पाला विरोध

कार्यक्रमाच्या सुरुवातीला (Hadapsar News) प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर अमृतवेल मिडिया समूहाचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले.

Hadapsar News

कार्यक्रमाचे संयोजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन डॉ. अतुल चौरे, समन्वयक प्रा. अजित भोसले आणि अनिता शिंदे यांनी केले. व्यासपीठावर अमृतवेल मिडिया समूहाच्या सारिका पवार, प्राचार्य दत्तात्रेय जाधव, प्राचार्य झीनत सय्यद, प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, प्रा. लालासाहेब खलाटे, उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, प्रो. डॉ. एकनाथ मुंढे, प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. शहाजी करांडे आणि प्रा. किसन पठाडे उपस्थित होते.

Lonavala Rural Police : लोणावळ्यात ऑनलाईन जुगारासाठी ८.७८ लाखांची चोरी; लातूर जिल्ह्यातून आरोपीला केली अटक

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम आणि डॉ. अर्चना पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ. संजय जगताप यांनी मानले. या सोहळ्याला साधना शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी तसेच एस. एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Us On

---Advertisement---