Team MyPuneCity – कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी हिंजवडी येथे घडली. यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले(Hinjewadi Bus Fire) आहे.
Pune Crime News 20 March 2025 : हडपसरमध्ये ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी; ३४.६३ लाखांचा ऐवज लंपास
[metaslider id=”3320″]
Missing Girl Found Dead : सांगवीतील बेपत्ता तरुणीचा लोहगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह
आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने गाडीत ठेवल्या. हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकल मुळे बसमध्ये आगीचा भडका उडाल्याचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आरोपीने ही गुन्ह्याची कबुली (Hinjewadi Bus Fire) दिली आहे.