---Advertisement---

Unconventional Protest : …अन् जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात पडला चक्क नोटांचा पाऊस!

Published On:
Unconventional Protest
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत अनोखे आंदोलन  (Unconventional Protest) केले. भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली.

अनिल शिरसाट असे आंदोलन करणाऱ्या (Unconventional Protest) कर्मचाऱ्याचे नाव असून, ते गेल्या तीन वर्षांपासून न्यायासाठी लढा देत आहेत. जिल्हा परिषद भरती प्रक्रियेनुसार, एकूण रिक्त पदांपैकी १० टक्के जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या जागा सेवा-ज्येष्ठतेनुसार भरल्या जातात, मात्र यंदाच्या भरतीत नियम पाळले गेले नाहीत, असा शिरसाट यांचा आरोप आहे.

[metaslider id=”3320″]

आंदोलनाची नाट्यमय घटनाक्रम

शिरसाट यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ “हे मिनी मंत्रालय नाही, मनी मंत्रालय आहे!”, “न्यायासाठी किती वर्षे वाट पाहायची?” अशा जोरदार घोषणा दिल्या. अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यातील काही हजार रुपयांच्या नोटा हवेत उधळून संताप व्यक्त केला. त्यांच्या या आंदोलनामुळे (Unconventional Protest) जिल्हा परिषदेच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Sant Tukaram Sugar Foctory : माघारीची मुदत संपून ३० तासांनंतरही अंतिम उमेदवार यादी गुलदस्त्यातच! निवडणूक अधिकारी ‘नॉट रिचेबल’

पोलीस कारवाई आणि पुढील प्रक्रिया

शिरसाट यांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या आंदोलनामुळे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील अपारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत नाराजी आहे.

YCM Hospital : उपचारासाठी आलेल्या रूग्णाने वायसीएम रूग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष – पुढील दिशा काय?

शिरसाट यांच्या आंदोलनामुळे (Unconventional Protest) इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्येही असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणात संघटित आंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणावर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संतापाचा परिणाम भविष्यात जिल्हा परिषदेसमोर मोठे आव्हान उभे करू शकतो.

Follow Us On

---Advertisement---